IND vs ENG 2nd Test Match (Day 5)
IND vs ENG 2nd Test Match (Day 5) | भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. भारताने इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे. पण पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ अजूनही सुरू होऊ शकलेला नाही.
शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा बर्मिंगहॅममध्ये सध्या (4.18 वाजता) पाऊस थांबला असला तरी मैदानावर अजूनही कव्हर आहेत आणि पंच लवकरच मैदानाची पाहणी करतील. पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशीचा खेळ पावसामुळे अजून सुरू झालेला आहे.
The wait continues! ⌛️
— BCCI (@BCCI) July 6, 2025
With a slight drizzle, we are expecting a further delay in the start of play.
Updates ▶️ https://t.co/Oxhg97fwM7#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/S6D0F70Bit
दरम्यान, इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या दीड शतकाच्या तसंच ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर 6 बाद 427 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील भारताच्या 180 धावांच्या आघाडीमुळं इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य असून काल चौथ्या दिवसअखेर इंग्लडच्या 3 बाद 72 धावा झाल्या होत्या. आकाशदीपनं दोन तर मोहम्मद सिराजने 1 गडी बाद केला. विजयासाठी भारताला आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी 7 बळींची आवश्यकता आहे.
तत्पूर्वी, पहिल्या डावात १८७ धावांची मोठी आघाडी घेणाऱ्या भारताने आपला दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला. शुबमनने सर्वाधिक १६१ धावांची वेगवान खेळी केली. त्याने १६२ चेंडूंचा सामना करताना ८ षटकार आणि १३ चौकारांची उधळण केली. उपकर्णधार ऋषभ पंतने ६५, रवींद्र जडेजाने नाबाद ६९ तर सलामीवीर केएल राहुलनेही ५५ धावांचे उपयोगी योगदान दिले.