IND vs ENG 1st T20 Match Toss update...
IND vs ENG 1st T20 Match Toss update | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर असतील.
तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टाॅस जिंकला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
🚨 Toss News from the Eden Gardens 🚨#TeamIndia have elected to bowl against England in the T20I series opener.
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/s8VPSM3xfT
दोन्ही संघांकडे या फॉरमॅटमधील अनेक तगडे खेळाडू आहेत. यामुळेच कोलकातामध्ये बॅट आणि बॉलमध्ये म्हणजेच दोन्ही संघात तीव्र लढाई पाहायला मिळू शकते. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदान अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार बनले आहे आणि हे मैदान टी-20 मध्ये भारतासाठी लकी असे मैदान आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सहा जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे.
विशेष म्हणजे, या मैदानावर भारताचा एकमेव टी-20 पराभव इंग्लंडकडून झाला आहे. 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला आता इंग्लंडला हरवण्याची संधी असेल.