Shikhar Dhawan
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा १९ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार असून या स्पर्धेचा थरार पाकिस्तान आणि यूएईमध्ये रंगणार आहे. तर भारताचे सर्व सामने यूएईच्या भूमीवर खेळवले जातील. दरम्यान, आयसीसीने भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सदिच्छा दूत म्हणून भारतीय संघाच्या गब्बरची निवड करण्यात आली आहे.
आयसीसीने धवनसह चार खेळाडूंना सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे.यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराड़ा अहमद, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी यांचा समावेश आहे.
Former India opener Shikhar Dhawan among four official event ambassadors unveiled by ICC for Champions Trophy. #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/lCAj57a2w6
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोनदा गोल्डन बॅट जिंकणारा शिखर धवन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. या सलामीवीर फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक 701 धावा केल्या आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी त्याने पाच सामन्यांमध्ये 363 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकलं होते. भारताला 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.
दुसरीकडे, सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला होता.