पुण्यात वर्ल्ड कपचे पाच सामने होणार, २७ वर्षांनंतर रंगणार विश्वचषकाचा खेळ
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ चे अंतिम वेळापत्रक अखेर आज जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तर विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने पुणे शहरात होणार आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहेत.
मुंबईत एका खास सोहळ्यात दुपारी १२ वाजता विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात यापूर्वीही झाले असले, तरी एकाच वेळेस इतक्या सामन्यांचे यजमानपद पुणे शहराला प्रथमच मिळाले आहे. तब्बल २७ वर्षांनी पुण्यात विश्वचषक सामन्याचे आयोजन होणार आहे.
यापूर्वी, १९९६ मध्ये पुण्यात विश्वचषक स्पर्धेचा अखेरचा सामना खेळविण्यात आला होता. पुण्यातील तेव्हाच्या नेहरु स्टेडियमवर २९ फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनया या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र क्रिकेच असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, “पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील ५ सामने खेळवले जाणार आहेत. याबद्दल मी बीसीसीआय, आसीसी, जय शहा यांचे आभार मानतो. सामने सुरू होण्यापुर्वी गहुंजे येथील स्टेडिअमची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत. यामध्ये पार्किंग, तिकीट काऊंटरसह असलेली इतर कामे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पुर्ण करण्यात येतील.”
असे असतील पुण्यातील सामने !