Rishabh Pant
IPL 2025 (DC vs LSG ,Rishabh Pant) | लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरूवात केली. दोन्ही संघात २४ मार्च सामना पार पडला. या सामन्यात, लखनौकडून निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. पण लखनौचा कर्णधार ऋषभ पंत शून्यावर बाद झाला. पंत बाद होताच त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
यावेळी पहिल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतकडून लखनौला खूप अपेक्षा होत्या. पण तो अपयशी ठरला. आयपीएल २०२५ च्या लिलावात २७ कोटींना विकला गेलेला पंत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे त्याचे नाव एका खास रेकॉर्डमध्ये नोंदले गेले. तो आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक चेंडू खेळणारा पण तरीही खाते उघडू न शकणारा दुसरा फलंदाज बनला आहे. या सामन्यात ६ चेंडूंचा सामना करूनही त्याला खाते उघडता आले नाही. या बाबतीत पहिले स्थान गौतम गंभीरचे आहे, साल २०१४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ८ चेंडू खेळूनही गंभीर खाते उघडू शकला नव्हता.
Rishabh Pant dismissed for a 6 ball duck. pic.twitter.com/2DSF5P7FTY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
IPL : सर्वाधिक चेंडू खेळूनही खाते न उघडणाऱ्या कर्णधारांची यादी..
(कर्णधार, विरोधी संघ, चेंडू, धावा, साल)
१. गौतम गंभीर ( मुंबई इंडियन्स, ८ चेंडू ० धावा), साल २०१४
२. ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स, ६ चेंडू ० धावा), साल २०२५*
३. व्हीव्हीएस लक्ष्मण ( कोलकाता,६चेंडू ०धावा), २००८
४. रिकी पॉन्टिंग (दिल्ली कॅपिटल्स, ६ चेंडू ० धावा), २०१३
५. विराट कोहली (हैदराबाद, ५ चेंडू ० धावा), २०१४
६. रोहित शर्मा (राजस्थान राॅयल्स)(५ चेंडू ० धावा), २०१५