राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ऋषिकेश दौंड 190धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर 22 यार्डस संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघासमोर 320धावांचे आव्हान उभे केले.
वीरांगन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी 22 यार्डस संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 68.5 षटकात सर्वबाद 320धावा केल्या. यात ऋषिकेश दौंडने 181चेंडूत 31चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 190 धावा चोपल्या. त्याला आर्यन देसाईने 110चेंडूत 9चौकारासह 71 धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 207 चेंडूत 177 धावांची भागीदारी केली.
क्लब ऑफ महाराष्ट्रकडून केदार बजाज (6-64), विशाल पारीक (3-55) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघ आज दिवस अखेर 16 षटकात 5बाद 64धावा केल्या. 22 यार्डसकडून वेदांत काळे (3-31), व्यंकटेश चव्हाण(2-28) यांनी अचूक गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
निकाल:
वीरांगन क्रिकेट मैदान:
पहिला डाव: 22 यार्डस: 68.5 षटकात सर्वबाद 320धावा (ऋषिकेश दौंड 190(181,31×4,1×6), आर्यन देसाई 71(110,9×4), देवेंद्र पाटील 27, साहिल नलगे 17, केदार बजाज 6-64, विशाल पारीक 3-55) वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 16 षटकात 5बाद 64धावा (ऋषिकेश त्रिगुणे 13, अक्षित इंगळे 15, वेदांत काळे 3-31, व्यंकटेश चव्हाण 2-28).