बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचा जाहीर पाठिंबा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राष्ट्रीय किसान संघटनेचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी भेट देऊन बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 9 Jun 2025
  • 07:55 pm

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राष्ट्रीय किसान संघटनेचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी भेट देऊन बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा दिला.  

शेतकऱ्यांशी संवाद करताना राकेश टिकैत म्हणाले की, 'देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. याला महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं  स्वतंत्र असं संघटन नाही. शेतकऱ्यांनी आपली संघटना मजबूत केली नाही. आपल्यासाठी लढणारा नेता निवडला नसल्याने आज सर्वाधिक आत्महत्या हया महाराष्ट्रात होताना दिसत आहे. जो नेता शेतकऱ्यांसाठी  लढतो, त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. कारण सध्याचं सरकार हे शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडत आहे. अनेक राजकीय पक्ष फोडले आहेत.'

त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सावध राहत आपली संघटना मजबूत केली पाहिजे. यासाठी बच्चू कडू यांना साथ देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना राकेश टिकैत यांनी केलं. 

तर प्रहाराचे  अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या जातीयवादी धोरणावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावून सरकार शेतीमालाच्या भावाकडे दुर्लक्ष करत आहे. दहा वर्षांपूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तोच भाव आज शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे  सरकारला त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे, अशी टीका सरकारवर बच्चू कडू यांनी केली आहे.

Share this story

Latest