"100 दिवसात महायुतीची एक विकेट गेली, आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच, त्यांनी यावेळी जो महिला, स्वतःच्या बायकोला, शेतकऱ्यांना त्रास देतो त्याची विकेट राष्ट्रवादी काढणार म्हणजे काढणार असही विधान त्यांनी यावेळी केल. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय गोटात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? विरोधकांच्या रडारवर आता कोणता मंत्री आहे? असे अनेक प्रश्न राजकारण्यांमध्ये उपस्थित होत आहेत.
महायुतीचे 100 दिवस होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकेच नव्हे तर महायुतीच्या 100 दिवसाच्या दरम्यान, राज्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील पक्षाच्या बैठकीत बोलताना महायुतीवर सुळे यांनी हल्लाबोल केला आहे.
विकेट काढणार म्हणजे काढणार
महायुतीची 100 दिवसात एक विकेट गेली. आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडेल. और अभी देखो आगे होता है क्या? असं म्हणत सुळे म्हणाल्या, जो महिला, स्वतःच्या बायकोला, शेतकऱ्यांना त्रास देतो त्याची विकेट राष्ट्रवादी काढणार म्हणजे काढणार.
तसेच, राज्यातील एक मंत्री खूप बोलत असून तो बायकोच्या आड लपून सगळे उद्योग करत असल्याचा दावा केला आहे. हिम्मत असेल, तर त्याने समोर येऊ लढावं. ही लढाई खूप मोठी आहे. हे ‘डबल डेंजर’ आहेत. अशा लोकांशी लढण्यात मजा आहे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
यासोबत बरं झालं आमचा पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, त्या अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही, अशा शब्दात नाव न घेत धनंजय मुंडेंवरही जहरी टीका सुळे यांनी यावेळी केली.