सग्रहीत छायाचित्र
राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. होळी सणाच्या शुभेच्छा देताना कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खास ऑफर दिली. यावरुन आता राजकारण तापले आहे. यावर आता महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोलेंच्या ऑफरवर बोलताना राऊत म्हणाले की, नाना पटोले आमचे सहकारी आहेत. जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.
दरम्यान, संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या दाव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची काल पिलेली भांग अजून उतरलेली दिसत नाही, अशा शब्दात म्हस्के यांनी टीका केली आहे. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, मग तुम्ही त्यांना मंत्री का बनवले? असा सवाल देखील त्यांनी विचारला.