Pankaja Munde : सुरेश अण्णा... मी अजूनही तुम्हाला.., पंकजा मुंडेंनी दिले सुरेश धसांच्या आरोपाला उत्तर

यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझा पराभव करून जे बीड जिल्ह्याचे खासदार झाले आहेत ते बजरंग बाप्पा." "मुख्यमंत्री साहेब बघा... राष्ट्रवादीच्या खासदारच्या नावासाठीही भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या जास्त वाजत आहेत." असेही त्या म्हणाल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 5 Feb 2025
  • 10:44 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहीत छायाचित्र

आष्टी -  "सुरेश अण्णा... मी अजूनही तुम्हाला अण्णा म्हणते, पण तुम्ही मला ताईसाहेब म्हणत नाहीत. आमच्याकडून तरी नातं अजूनही तसंच आहे,"  भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानसभा निवडणुकीत मला मदत न करता अपक्ष उमेदवाराला मदत केली, या  आरोपाला पंकजा मुंडें यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिले आहे. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगद्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. 

 यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझा पराभव करून जे बीड जिल्ह्याचे खासदार झाले आहेत ते बजरंग बाप्पा."  "मुख्यमंत्री साहेब बघा... राष्ट्रवादीच्या खासदारच्या नावासाठीही भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या जास्त वाजत आहेत." असेही त्या म्हणाल्या.

 "पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत मला मदत न करता अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना मदत केली," असा आरोप सुरेश धस हे निवडणूक निकालापासून करत होते. आता पंकजा मुंडे यांनी त्यांना प्रतिउत्तर देताना म्हणटले आहे की,  "मेरा वचनही मेरा शासन है"  मी गोपीनाथ मुंढेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंढेंनी धस यांना उद्देशून म्हटले आहे.

Share this story

Latest