Maharashtra Politics | शिवसेना(UBT)-मनसे मनोमिलनाचे संकेत..? सेना भवनासमोर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच बॅनरवर...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्रशासन लागले असून दुसरीकडं राजकीय पक्षांनी देखील आता रस्त्यावर उतरून तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 11 Jun 2025
  • 05:31 pm
politics, Maharashtra,

UBT Shivsena & MNS News....

मुंबई | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्रशासन लागले असून दुसरीकडं राजकीय पक्षांनी देखील आता रस्त्यावर उतरून तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आता शाखा भेटी घेण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडं युती आणि आघाडीच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. एका बाजूला पवार काका पुतणे एकत्र येणार अशा चर्चा असतानाच दुसरीकडं, मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चा देखील शिगेला पोहोचल्या आहेत. अशातच आता ठाकरे काका पुतण्यांचे बॅनर सेना भवन परिसरात लागण्यास सुरुवात झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं सेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचे जरी मनोमिलन झालं नसलं तरी दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांचे युतीसाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होत आहे. अशातच आता हे प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुख्यस्थानापर्यंत येऊन पोहचले आहे. करण उद्धव ठाकरेंच्या युवा सेनेनं ठाकरे काका पुतण्याचे एकत्र बॅनर लावत काका-पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेना भवन समोर लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकत्र शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच एकाच बॅनर वर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना युवा सेनेने अशा पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत. त्यामुळे बॅनरवरचं चित्र आता नेमकं कधी सत्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या काका पुतण्यांचा फोटो प्रथमच एका बॅनरवर झळकतांना पाहायला मिळतोय. युवासेनेकडून हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स तयार करण्यात आले असून 13 जून रोजी होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या पोस्टर्सवर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे पोस्टर्स सेना भवन समोर त्यासोबतच राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर लावण्यात आले आहे.

डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले निमित्त होते एका कामनिमित्त चहापानचे . डोंबिवली पश्चिमेकडील ठाकरे गटाच्या शाखेत मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत गेले आणि त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली .यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिला. या आधी देखील पलावा पुलाच्या आंदोलनात मनसे आणि ठाकरे गट एकत्र दिसला होता . त्या पाठोपाठ आता मनसेचे शहर अध्यक्ष यांनी ठाकरे गटाच्या शहर शाखेत भेट दिली. यानंतर डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Share this story

Latest