संग्रहीत छायाचित्र
मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. नाना पटोले यांची जागा हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीनंतर पटोले यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. सपकाळ हे पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील बुलढाण्यातील आमदार असलेले सपकाळ हे काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत सचिवही राहिले आहेत. सध्या ते काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे अध्यक्ष आहेत.
दरम्आयान, आज (दि.13) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर होती. हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.