Accident : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचे अपघाती निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे रस्ते अपघातात निधन झाले. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्याच्या दुचाकीला धडक दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 13 Feb 2025
  • 01:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहीत छायाचित्र

अकोला -  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे रस्ते अपघातात निधन झाले. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिवनीजवळ हा अपघात झाला. अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान बिडकर यांचा मृत्यू झाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिडकर हे मानकर यांच्यासोबत दुचाकीने शिवणी विमानतळावर गेले होते. भेट झाल्यानंतर परत येताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिवर येथील पेट्रोल पंपाजवळ जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) बिडकर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ३० बीआर ९११०) जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर असलेले बिडकर व मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Share this story

Latest