हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवार, भुजबळ यांना बडतर्फ करा; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना जाहीर आवाहन

पुणे: मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका ही संपूर्ण मंत्रीमंडळाची भूमिका असते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भुमिका मांडून देखील त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले जात असून सरकारविरोधात बंड केले जात आहे.

संग्रहित छायाचित्र

खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला

पुणे: मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका ही संपूर्ण मंत्रीमंडळाची भूमिका असते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भुमिका मांडून देखील त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले जात असून सरकारविरोधात बंड केले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळी भुमिका मांडली आहे. याचाच अर्थ सरकारच्या मंत्रिमंडळात बेबनाव असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना मी बडतर्फ करतोय अशी शिफारस राज्यपालांना त्यांनी करावी असे जाहीर आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांनी सोमवारी (दि. २९)पुण्यात दिले. खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.  (Latest News Pune)

राऊत म्हणाले, ''एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्याचे नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांचे ऐकावं असं ते नेतेही नाहीत. ते घटनाबाह्य पद्धतीने पदावर बसलेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर बेकायदेशीर बसले आहेत. शिंदे स्वत:ला नेते साध्य करण्यासाठी कधी काय निर्णय करतील हे मला सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या मराठा आंदोलनाला मॅनेज करण्याची क्षमता नाही. हा अंतर्गत राजकारणाचा घोटाळा आहे.''

महाराष्ट्र खड्ड्यात घालणारेच आज सत्तेमध्ये बसले आहे. अशा लोकांवर थुंकायचे नाही तर काय फुले उधळायची का? एकेकाळी महाराष्ट्र दिल्लीमध्ये ताठ मान करून वावरत होता, परंतु आज मात्र या भ्रष्टाचारी आणि बेईमान लोकांमुळे महाराष्ट्राची मान संपूर्ण देशामध्ये शरमेने खाली गेली आहे. त्यांच्या विरोधातील लढा शिवसेना कायम सुरू ठेवणार आहे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

अजित पवार यांचाही घेतला समाचार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. त्याबाबत खासदार राऊत यांना विचारले असता, पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, पण आता ही गुंडांची राजधानी झाली आहे. नेत्यांची पोरबाळं सहजपणे गुंडांच्या खांद्यावर हात टाकत आहेत. यातून लोकांनी कोणता आदर्श घ्यावा?, लोकांनी स्वतःला सुरक्षीत कसे समजायचे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की गुन्हेगारांचे बॉस, असा प्रश्न उपस्थित करुन आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, आम्ही काही केले तरी आमच्यावर काही कारवाई होणार नाही असे भाजपचे लोक जाहीरपणे सांगत आहेत. गुन्हेगारांच्या भाषेत डॉनला बॉस म्हणतात. मुंबईत हे आम्ही सर्व काही पाहिले आहेत. सागर बंगल्यावरचे जे बॉस आहेत, त्यांनी ते गृहमंत्री आहेत की बॉस आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. असे त्यांनी सांगितले. 

नार्वेकरांवर साधला निशाणा...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याता आली आहे. या नियुक्ती बाबत राऊत यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला.‘नार्वेकर यांनी १० वेळा पक्षांतर करून ही पक्षांतरे पचवून ढेकर देत आहेत. शिवसेनेच्या फुटीला बेकायदेशीरपणे मान्यता दिली अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड असल्याचा आरोप केला. 

भाजपचेच वस्त्रहरण...  

जेडीयूचे नेते नीतीश कुमार यांनी पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावर संजय राऊत यांनी टीका केली. मुळात नितेश कुमार ही फार मोठी ताकत आहेत, असे मी कधीच मानत नाही. ते फक्त बिहारचे नेते आहेत. गेल्या ४ वर्षात त्यांनी ४ वेळा निर्णय बदलला आहे. बिहारमध्ये फक्त विरोधी पक्ष बदलतो. सत्तेत तोच पक्ष राहतो. या निर्णयामुळे सगळ्यात जास्त वस्त्रहरण भाजपचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

जागा वाटपाला फॉर्म्युला नाही तर आम्ही...

लोसभेच्या जागा वाटपाबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राऊत म्हणाले, ''ज्या जागांवर सध्याचे खासदार आहेत त्यावर फार चर्चा केली जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेत आहोत. राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्याशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच ‘जागा वाटपाला फॉर्म्युला नाही तर आम्ही योग्य जागा वाटप म्हणतो. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Share this story

Latest