,Anjali Damania,dhananjay Munde
मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना तब्बल 88 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप दमानिया यांनी केला. तसेच अनेक पुरावे सादर करत दमानिया यांनी मुंडेंविरोधात धक्कादायक खुलासे केले. दरम्यान, दमानियांची पत्रकार परिषद संपताच मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवरांच्या भेटीला पोहचले आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत नेमकी चर्चा काय होणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.
राज्य मंत्रिंडळाची बैठक आज होत आहे. या बैठकीपूर्वीच अंजली दमानिय यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंविरोधात पुरावे सादर करत धक्कादायक केले. दरम्यान मुंडे अजित पवार यांच्या भेटीला गेले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दमानिया यांनी केलेल्या नव्या आरोपांसंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी मुंडे अजित पवारांची भेट घेतली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पत्रकार परिषदेत अंजलि दमानिया यांनी कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहेत. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बाटल्यांच्या खरेदीमध्ये तब्बल ८८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच, इतर बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यांतही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे दमानिया यांनी म्हटलं आहे.
दमानिया यांच्या मुंडेंविरोधतच्या सततच्या आरोपांमुळं पक्षाची आणि महायुतीची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना राजकीय वर्तुळात अनेत नेत्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळ अजित पवार लवकच मुंडेंविरोधात निर्णय घेतल असं बोललं जात आहे.