मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक आहे याचा खुलासा केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्याआधी जवळचे असल्याचे विधान केलं होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. अशातच आता त्यांनी दोन्ही नेत्यांमधील फरक स्पष्ट केला आहे. तसेच दोघांमध्ये नात कसं जपलं जात? हेदेखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. गेल्या तीन महिन्यापूर्वी म्हणजेच, डिसेंबरमध्ये राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झाले तर, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर राज्यात एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली.
दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी नाट्य कोण करतं?
एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या मुद्दयावरुन फडणवीस यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाट्या कोण करतं असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, नारजी नाट्य दोघांमध्ये कोणीच करत नाही. अलिकडच्या काळात सोशल मीडियामुळं कोणत्याही गोष्टीला चुकीचे वळण दिलं जाते. अनेक अडचणी येत असताता आम्ही एकत्र बसून सोडवतो.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला दोघांमधील फरक
'शिंदे साहेब शिवसैनिक आहेत आणि जो शिवसैनिक असोत तो भावनिक असतो. तसे ते भावनिक आहेत. तर अजित पवार हे प्रॅक्टीकल आहेत. अजित पवार हे राजकारणांमध्ये प्रॅक्टीकल विचार करुन निर्णय घेणारे आहेत. त्यामुळं दोघांशी नात जपताना हे मला लक्षात ठेवावं लागतं की, अजित पवारांसोबत वागतान प्रॅक्टीकल विचार करावा लागेल आणि शिंदेंसोबत वागताना मला भावनिक बाजू जाणून घेऊन नात जपावं लागतं. आणि हे मी सांभाळल तर आमच्यात कोणतीही अडचण येत नाही. अस मोठं विधानदेखील त्यांनी यावेळी केलं.
फडणवीसांच्या जवळचे एकनाथ शिंदे
जंयत पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी सर्वात जवळंच कोण? असा सवाल उपस्थित केला असता, फडणवीसांनी सावध भूमिका घेत दोघेही जवळचे आहे असं वक्तव्य केलं. पण जयंत पाटलांनी मुद्दा सोडला नाही. पुन्हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे आमच्या पहिल्यापासून आमच्या विचाराचे आहेत. आमची दोस्ती आधी झाली अजित पवार यांच्याशी दोस्ती नंतर झाली. पण तसे दोघेही जवळचेच आहेत. असं विधान फडणवीस यांनी केलं.
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं का? असा सवाल राजकीय गोटात उपस्थित होत आहे.