संग्रहीत छायाचित्र
मुंबई- बांग्लादेशी घुसखोरी भाजप किंवा केंद्र सरकार काहीही बोलत नाही, अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिका केली. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
"अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ" संघटनेचे युवराज श्रीमान आदित्य ठाकरे...
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 21, 2025
तुम्ही कधीच न निवडून आलेल्या विश्वविख्यात प्रवक्त्यांंचा आदर्श ठेवण्यापेक्षा...
मर्दासारखे चर्चेला या... सदैव पळ काढत राहण्यापेक्षा करु खुली चर्चा एकदा ...
"बांग्लादेशी घुसखोरी आणि नव्या मातोश्रीची…
भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ” संघटनेचे युवराज श्रीमान आदित्य ठाकरे तुम्ही कधीच न निवडून आलेल्या विश्वविख्यात प्रवक्त्यांंचा आदर्श ठेवण्यापेक्षा मर्दासारखे चर्चेला या. सदैव पळ काढत राहण्यापेक्षा करु खुली चर्चा एकदा. “बांग्लादेशी घुसखोरी आणि नव्या मातोश्रीची भोंदूगिरी!” “मातोश्रीची लाडकी बहिण ममता दिदी आणि बांगलादेशी घुसखोरी !” जागा.. वेळ.. ठरवा आणि आम्हाला कळवा आम्ही तयार आहोत !! असे आव्हानच आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. त्यांनी या बाबतची पोस्ट सोशलमिडीयावर कली आहे.