संग्रहित छायाचित्र
लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी सुरू झाली असून अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावरून महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले होते. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी काही महिला स्वत:हून पैसे परत करत आहेत. त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करण्यात येतीलअसे म्हटले होते. तटकरे यांच्या या विधानामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अपात्र लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का? याचे पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. त्यामुळे या राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही काळापासून लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकावर टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं.
अजित पवार यांनी केलं स्पष्ट
पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लाडक्या बहिणींकडून पैशाची रिकव्हरी करणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी दिले.