Advertisement

‘PMY’ scheme : ‘पीएमवाय’ योजनेतून डुडुळगाव मधील घरांची सोडत कधी?

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत डुडुळगाव येथे ११९० सदनिका उभारण्यात येत आहेत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. लाभार्थींनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज महापालिकेकडे सादर केलेले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत डुडुळगाव  येथे ११९०  सदनिका उभारण्यात येत आहेत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. लाभार्थींनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज महापालिकेकडे सादर केलेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पर्यंत ३३०० जणांनी महापालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. मात्र अजूनही सोडत प्रक्रिया सुरू नसल्यामुळे घरांची वाट पाहावी लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डुडुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी शासन आणि लाभार्थी यांची भागीदारी आहे. सदनिकांची किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये आहे. यामध्ये केंद्र शासन प्रतिसदनिका दीड लाख रुपये तर राज्य शासन प्रति सदनिका एक लाख रुपये अनुदान देणार आहे. लाभार्थीला प्रति सदनिका १४ लाख १४ हजार १७३ रुपये स्वहिस्सा भरावा लागणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये अर्ज भरणे सुरू झाले असून नोंदणीसाठी मुदत नोव्हेंबर २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती; मात्र अर्जांची मुदत संपून सहा महिने उलटले तरीही सोडत होत नसल्याने अर्जदार वाट पाहत आहेत.

सदनिकांची आरक्षण निहाय माहिती

सदनिकांची विभागणी आरक्षणानुसार करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गासाठी ५९५, अनुसूचित जातींसाठी १५५, अनुसूचित जमातीसाठी ८३ आणि इतर मागास प्रवर्गासाठी ३५७ सदनिका राखीव आहेत. दिव्यांगांसाठी पाच टक्के समांतर आरक्षण आहे. ऑनलाईन अर्जासोबत १० हजार रुपये अनामत रक्कम आणि ५०० रुपये नोंदणी शुल्क असे एकूण १० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले आहेत. सोडतीमध्ये विजेता न झालेल्या आणि प्रतीक्षा यादीत नाव न आलेल्यांना अनामत रक्कम योजनेत नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाइन मार्गे परत करण्यात येणार आहे.

 

डुडुळगाव येथील ११९० सदनिकांसाठी आतापर्यंत ३३०० अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी सुरू आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर सोडत जाहीर केली जाईल. ही सोडत या महिन्यात करण्यात येईल.

अण्णा बोदडे, उपायुक्त, महानगरपालिका

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

थकबाकीदार पुन्हा महापालिकेच्या रडारवर; धनादेश न वटलेल्या मालमत्ता होणार सील

Next Post

Dehu Road Cantonment : देहूरोड कॅन्टोन्मेंट पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलिनीकरण नाही; समावेशास रेड सिग्नल