Advertisement

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला, एनडीएचा उमेदवार कोण?

संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे उपराष्ट्रपतीपद आता रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

नवी दिल्ली – संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे उपराष्ट्रपतीपद आता रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:

* ७ ऑगस्ट: निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

* २१ ऑगस्ट: उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख

* २५ ऑगस्ट: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

* ९ सप्टेंबर: मतदान सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पार पडणार; त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी

उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतात. सद्यस्थितीत दोन्ही सभागृहांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) बहुमत असल्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी पक्षासाठी फारशी अवघड ठरण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीए उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे भाजपाच्या रणनीती आणि उमेदवाराच्या नावावर उत्सुकतेचं वातावरण आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

IND vs ENG 5th Test | ओव्हल कसोटीत भारताची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवस अखेर 6 बाद 204 धावा....

Next Post

यवत गावात आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव; दुचाकींना आग, धार्मिक स्थळावर हल्ला