Advertisement

‘ऐसा माल चाहिए…’, प्रांजल खेवलकर यांच्या फोन मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट

पुणे पोलिसांनी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.

पुण्यात खराडी परिसरातील पार्टीत ड्रग्स प्रकरणी शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पतीसंदर्भात नवनवे खुलासे समोर येत आहेत. खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जण अटक आहेत. दरम्यान, दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा शिवाजी नगर न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. यावळी पुणे पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली.

प्रांजल खेवलकर याने मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केला होता असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

 खेवलकर यांच्यासह पाच आरोपींना पुणे पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं. यावेळीही  रोहिणी खडसे आज पुन्हा वकिली पोशाख घालून न्यायालयात हजर होत्या. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी  ५ ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती न्यायालयात दिली आहे. 

खेवलकरांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत आहे ज्यात म्हटलंय की ‘ऐसा माल चाहीए’. यातील महिला आरोपी आणि प्रांजल २ वर्षापासून एकमेकांशी बोलतात. हा अमली पदार्थ यांनी आणला. परंतु कुठून आणला हे सांगत नाहीत. गेली २ वर्ष प्रांजल हे त्या हॉटेलमध्ये येतात पार्टी करतात. राहुल नावाचा अजून एक आरोपी आहे तो फरार आहे.  आम्हाला अजून पोलीस कोठडी हवी आहे प्रांजल यांच्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत, व्हिडिओ आहेत त्याबाबत तपास करायचा आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये; एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्त यांना निर्देश

Next Post

आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरातून दुचाकी चोरणारे तिघे चोरटे जेरबंद; पाच दुचाकी जप्त; आंबेगाव पोलिसांची कामगिरी