पुण्याच्या लेकीची ‘गगन’भरारी
Pimpri-Chinchwad: म्हाडाच्या घरांची होणार टाउनशिप; २२ मजली टॉवर उभारण्यासाठी नागरिक आले एकत्र
Pimpri-Chinchwad: नदी स्वच्छता आंदोलनाबाबत कारभाऱ्यांचे मौन
Advertisement

Pimpri-Chinchwad: म्हाडाच्या घरांची होणार टाउनशिप; २२ मजली टॉवर उभारण्यासाठी नागरिक आले एकत्र

औद्योगिक नगरीत आलेल्या कष्टकरी आणि गरिबांना हक्काचे छप्पर देण्यासाठी म्हाडाने गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये घर बांधली. आता याच घरांपैकी संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या ९०० घरांचे री-डेव्हलपमेंट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

औद्योगिक नगरीत आलेल्या कष्टकरी आणि गरिबांना हक्काचे छप्पर देण्यासाठी म्हाडाने गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये घर बांधली. आता याच घरांपैकी संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या ९०० घरांचे री-डेव्हलपमेंट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ९ एकर जागेत ही घरे असून, २० ते २२ मजली इमारती उभारण्याचा विचार सध्या केला जात आहे. म्हाडाने ही सगळी बैठी आणि दुमजली घरे दिली होती. ही घरे १ बीएचके आणि १ आरके असून, म्हाडाने जेव्हा ही घरे दिली तेव्हा ती २४० आणि १२० स्क्वेअर फुट होती. मात्र, कालांतराने येथील नागरिकांनी बांधकाम करून हीच घरे ५०० ते ६०० स्क्वेअर फुट करून घेतली आणि महापालिकेला त्याचा अतिरिक्त टॅक्स दिला जात आहे. ९०० लोकांनी प्रत्येकी ६०० रुपये भरून म्हाडाकडून शेअर सर्टिफिकेट घेतले आहे. या सर्वांचे एक गृहरचना संस्था रजिस्टर केली जाणार आहे.

म्हाडा अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांची या विषयाबाबत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्या बैठकीसाठी म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते. सर्वाधिक स्क्वेअर फुट आणि सर्व अम्युनिटीज देणाऱ्या बांधकाम व्यवसायिकालाच री-डेव्हलपमेंटचे अधिकार देण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला आहे. अनेकांची घरे अद्याप नावावर झालेले नाहीत. अनेकांनी यापूर्वी महापालिकेचा टॅक्स भरलेला नाही. त्यामुळे आता या नागरिकांची धावपळ सुरू झाली असून, एका वकिलाचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठी टाऊनशिप झाल्यावर प्रभाग रचना बदलली जाऊ शकते. एक गठ्ठा मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला पडू शकते यामुळे आत्तापासूनच येथील काही स्थानिक राजकीय व्यक्ती यांनी या नियोजित प्रकल्पामध्ये अधिक रस घेतला आहे. राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्याने मतमतांतरे सुरू झाली असून नागरिकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी चढावर सुरू झाली आहे. ९०० लोकांपैकी आत्तापर्यंत साडेपाचशे लोकांनी म्हाडामध्ये सहाशे रुपये भरून शेअर सर्टिफिकेट घेतले आहे. सर्वांनी एकत्र येऊन गृहरचना संस्था रजिस्टर करावी अशी सूचना म्हाडाने केली आहे. तर स्थानिक नेत्यांचे म्हणणे वेगळेच असून, यातून या प्रकल्पामध्ये कोणता बांधकाम व्यावसायिक पुढे करायचा यातून भविष्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.

९०० लोकांनी एकत्र आल्यास ९ एकर जागेचा री-डेव्हलपमेंट प्रकल्प उभा राहिल्यास अधिकचा एफएसआय मिळू शकेल त्यामुळे नागरिक एकत्र होऊ लागले आहेत. तसेच नागरिकांनी एकत्र येऊन ही टाउनशिप उभारल्यास ती जिल्ह्यातील म्हाडाची री डेव्हलपमेंट होणारी पहिलीच गृहरचना संस्था ठरणार आहे.

रस्त्यांची आखणी नव्याने होणार

लघु उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट अशा विभागणीत २१ ब्लॉक मध्ये ९०० घरे म्हाडाने ४० वर्षांपूर्वी बांधली आहेत. या घरांच्या आसपास महापालिकेने कालांतराने रस्ते, सांडपाणी, झाडे, फुटपाथ, पथदिवे उभारून दिले आहेत. तसेच या २१ ब्लॉक बाहेरून महानगरपालिकेचे टाऊन प्लॅनिंग नुसार रस्ते देखील आहेत. मोठी टाऊनशिप एकत्रित रित्या उभारल्यास अंतर्गत रस्ते आणि वल्लभनगर संत तुकाराम नगर भोसरी यांना जोडणाऱ्या रस्त्यांबाबत नव्याने आखणी करावी लागू शकते.

नागरिक आमच्याकडे आले होते. त्यांच्या मागणीनुसार मी स्वतः अधिकाऱ्यांसह संत तुकारामनगर भागात जाऊन पाहणी केली. तसेच बैठक घेतली. नागरिकांना आवश्यक असणारी सगळी मदत म्हाडाच्या माध्यमातून केली जाणार आहे. नागरिक स्वतः हून पुढे येऊन हा प्रकल्प उभारत असल्याने ही स्वागतार्ह बाब आहे. 

– शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, पुणे म्हाडा

खासगी गृहरचना संस्थांप्रमाणेच आम्हाला सगळ्या अमेनिटीज हव्या आहेत. काही लोकांनी अतिरिक्त वाढीव बांधकाम केले असले तरी त्याबाबतचा कर महापालिकेला भरला जातो. किती स्क्वेअर फुट घर मिळणार याबाबत आजी-माजी नगरसेवक भिन्न माहिती देत आहेत. ठराविक बिल्डर येथे आणण्यासाठी राजकीय लोकांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, आम्हाला हव्या त्या सोयी आणि मोठी घरे देणाऱ्याला बिल्डरला आम्ही जागा देऊ, याबाबत आम्हा सर्वांचे एकमत झाले आहे.

-संत तुकारामनगरमधील एक रहिवासी

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

पुण्याच्या लेकीची ‘गगन’भरारी

Next Post

Pimpri-Chinchwad: नदी स्वच्छता आंदोलनाबाबत कारभाऱ्यांचे मौन