Advertisement

“तू एक साधा पीएसआय….” मध्यरात्री पोलीस ठाण्यात रोहित पवारांचा ड्रामा

मध्यरात्री रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुरुवारी रात्री विधान परिसरात घडलेल्या घटनेनंतर मध्यरात्री रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी पवारांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावीची भाषा वापरली. 

 गुरुवारी विधानभवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. या वादात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला. या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोन्ही आमदार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. अन् पोलिसांना दिला इशारा…

पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

नितीन देशमुख यांना पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर झोपून ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी खेचून काढत गाडीला रस्ता करून दिला होता. यानंतर नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले आहे हे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र, पोलीस त्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य करत नव्हते. यावेळी पवार भलतेच संतापले. यावेळी त्यांनी पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. 

आवाज खाली…..

आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार हे समर्थकांसह पोहोचले. यावेळी पोलिसांकडून योग्य पद्धतीने उत्तरे न दिल्याने रोहित पवार हे पीएसआयवर चिडल्याचे दिसून आले. यावेळी वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद थांबवला. मात्र यावेळी रोहित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. “आवाज खाली!! आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला.शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का चला व्हा तिकडे. आमदाराला हात लावायचा नाही.” अशा शब्दात पीएसआयला सुनावले. 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

'होय माझी चूक झाली मी..', भर सभागृहात भास्कर जाधवांनी मागितली जाहीरपणे माफी

Next Post

Monsoon Session 2025 | राज्यातील काही नेते अन् प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात - अंबादास दानवे