Advertisement

येत्या आठ दिवसांत लिलाव

पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडून मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस देण्यात येते. मुदतीत थकबाकी न भरल्यास पालिकेकडून मिळकती जप्त केल्या जातात. त्याप्रमाणे गेल्या वर्षी ९० तो १०० मिळकती पालिकेने जप्त केल्या आहेत.

मुदतीत थकबाकी न भरल्यास पालिकेकडून जप्त केलेल्या १०० मिळकतींचा होणार लिलाव

पुणे महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडून मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस देण्यात येते. मुदतीत थकबाकी न भरल्यास पालिकेकडून मिळकती जप्त केल्या जातात. त्याप्रमाणे गेल्या वर्षी ९० तो १०० मिळकती पालिकेने जप्त केल्या आहेत. त्यांचे मूल्यमापन करण्यात आले असून, पुढील आठ दिवसांत या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती कर आकारणी विभागाचे प्रमुख प्रतिभा पाटील यांनी सांगितली.

पालिकेकडून मिळकतदारांना कर थकविल्या प्रकरणी नोटीस देण्यात येते. नोटीसमध्ये देण्यात आलेल्या कालावधीत कराची रक्कम भरणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकवेळा नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र, वारंवार नोटीस बजावूनही मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर, पालिका प्रशासनाकडून संबंधित मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येते. 

मागील वर्षी मिळकत कर विभागाने शहरातील ९० ते १०० मिळकतींवर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर या मिळकतींच्या मूल्यांकनाची प्रक्रियाही पार पडली आहे, त्यानंतर संबंधित मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नव्हती.

दरम्यान, आता महापालिकेकडून संबंधित मिळकतींची लवकरच लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सध्या मिळकतींवर बोजा चढविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, आठ दिवस आगोदर लिलावाची तारीख जाहीर करून लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याबाबत मिळकत कर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘मागील वर्षी जप्त केलेल्या मिळकतींचे मूल्यांकन झालेले आहे, लवकरच लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

Next Post

Pune : महासंचालक विवेक श्रीवास्तव यांची अग्निशमन दलास भेट