काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्याने आत्महत्या केली. या प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप झाले आणि तिला तुरुंगात जावे लागले. आत्महत्या प्रकरणात क्लिन चीट तर मिळाली, पण तिचे करिअर संपले. इतकेच नाही तर तिच्या भावाचंही करिअल संपुष्टात आलं. आधीच करिअरमधील सगळेच सिनेमे फ्लॉप, त्यात वैयक्तिक आयुष्यामुळे आलेल्या या वादळामुळे ती खूप चर्चेत राहिली. पण तिने न खचता व्यवसायत नशीब आजमावले.
आता तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. ही तरुणी म्हणजे रिया चक्रवर्ती होय. खरं तर रिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, त्या काळात रिया त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतने २०२० मध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात रियाचं नावही आलं. तिच्यावर ड्रग्जचे सेवन करण्याचे, सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आणि मनी लाँडरिंगचे आरोप झाले. या प्रकरणात रियाबरोबर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीही अडकला. दोघांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात नंतर रिया व शौविक दोघांना क्लिनचिट मिळाली. पण या घटनेनंतर रियाचं करिअर बरबाद झालं. आता रिया पुन्हा एकदा तिचं करिअर रुळावर आणण्याचा प्रयत्न करतेय.
फिल्मी करिअरला फ्लॉपचं ग्रहण लागलेल असतानाच रियाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले. ती सुशांत सिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. याच काळात सुशांतने आत्महत्या केली.
रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, ड्रग्ज घेण्याचे व मनी लाँडरिंगचे आरोप झाले. तिला २७ दिवस तुरुंगात राहावं लागलं. सुशांत प्रकरणामुळे रियाचं वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी करियर दोन्ही बरबाद झाले. सुशांत आत्महत्या प्रकरणात नंतर तिला क्लिन चीट मिळाली.


