File Photo
चंदीगड: हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. याचे पहिले कारण आहे माजी कुस्तीपटू विनेश फोगाट. मात्र, तिच्या विरोधात निवडणूक लढवणारे इंडियन नॅशनल लोकदल-बहुजन समाज पक्ष युतीचे उमेदवार सुरेंद्र लाठरही चर्चेत आहेत. ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांचे व्हायरल झालेले प्रतिज्ञापत्र. आमदार झाल्यावर काम न केल्यास आपण राजीनामा देऊ, असे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रात सुरेंद्र लाठर परिसराच्या विकासाची शपथ घेत आहेत. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी चार आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांचा जुलानाच्या जनतेशी थेट संबंध आहे. या आश्वासनांची पूर्तता करता न आल्यास आपल्या पदाचा राजीनामा देईन, असे आश्वासनही त्यांनी शपथपत्रात दिले आहे.
या जागेवर इंडियन नॅशनल लोकदलचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. येथे सर्वाधिक जाट मतदार आहेत. लाठर हे प्रदीर्घ काळापासून येथील समाजसेवेशी संलग्न आहेत. आयुक्तपदावरून व्हीआरएस घेऊन ११ वर्षांपूर्वी ते राजकारणात आले. त्यांच्या कुटुंबाचा येथे चांगला प्रभाव आहे.
११ सप्टेंबर रोजी, हरियाणा निवडणुकीच्या अगदी आधी डॉ. सुरेंद्र सिंह लाठर यांनी भाजप सोडला आणि इंडियन नॅशनल लोकदलामध्ये सामील झाले. यानंतर लगेचच इंडियन नॅशनल लोकदलाने जुलाना विधानसभेतून पक्षाचे उमेदवार घोषित केले होते
जुलाना ही जागा या जागेवर इंडियन नॅशनल लोकदलचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. येथे सर्वाधिक जाट मतदार आहेत. लाठर हे प्रदीर्घ काळापासून येथील समाजसेवेशी संलग्न आहेत. आयुक्तपदावरून व्हीआरएस घेऊन ११ वर्षांपूर्वी ते राजकारणात आले. त्यांच्या कुटुंबाचा येथे चांगला प्रभाव आहे. २०१९ मध्ये चौटाला कुटुंबात फूट पडल्यानंतर मतदार इंडियन नॅशनल लोकदल सोडून जेजेपीकडे वळले. जेजेपीची भाजपशी युती आणि शेतकरी आंदोलनामुळे लोक नाराज आहेत.
११ सप्टेंबर रोजी, हरियाणा निवडणुकीच्या अगदी आधी डॉ. सुरेंद्र सिंह लाठर यांनी भाजप सोडला आणि इंडियन नॅशनल लोकदलामध्ये सामील झाले. यानंतर लगेचच इंडियन नॅशनल लोकदलाने जुलाना विधानसभेतून पक्षाचे उमेदवार घोषित केले होते.
काँग्रेस येथे १५ वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये ही जागा आयएनएलडी आणि जेजेपीकडे राहिली. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विनेशवर डाव खेळला आहे. या जागेवर भाजपलादेखील कधीही खाते उघडता आले नाही. येथे जाट उमेदवारांना जनतेची पहिली पसंती मिळाली आहे. ओबीसी समाजाचे २९ हजार तर ब्राह्मण समाजाचे २१ हजार मतदार आहेत. तेही भाजपच्या बाजूने गेले आहेत.