Vice President : ‘त्या’ न्यायाधीशांवर FIR का दाखल केला नाही? उपराष्ट्रपती धनखड यांचा सवाल

दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या कथित रोकड प्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही? असा सवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Fri, 18 Apr 2025
  • 08:39 am
pune mirror, crime news, marathi news, pune news, pune police

संग्रहीत छायाचित्र

दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या कथित रोकड प्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही? असा सवाल  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित केला. वर्मा यांच्या निवासस्थानी आढळलेल्या रोकड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल का आला नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

विद्यमान न्यायाधीशाविरुद्ध भारताचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती यांच्यामार्फत एफआयआर नोंदविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रदीर्घ संवैधानिक प्रक्रियेवरही धनखड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच संवैधानिक पदावर असलेल्या न्यायाधीशांनाही एफआयआरमधून सूट देता कामा नये, असे ते म्हणाले.

 

 

 

Share this story

Latest