US military aircraft
नवी दिल्ली - बुधवारी दुपारी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान C-17 अमृतसरमध्ये उतरले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतर देशातील स्थलांतरितांवर केलेली ही पहिलीच कारवाई आहे. हद्दपार झालेल्यांच्या संख्येची अधिकृत पुष्टी अद्याप प्रतीक्षेत आहे. या विमानात एकूण 104 भारतीय प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे.
या विमानात 104 भारतीय प्रवासी आहेत. 13 मुले, 79 पुरुष आणि 25 महिलांचा यामध्ये समावेश असून यापैकी 33 जण गुजरातमधील आहेत. त्यांना थेट विमानतळावरून गुजरातला पाठवले जाणार आहे. अमृतसरला पोहोचलेल्या या विमानातील बहुतांश लोक पंजाबचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे नागरिक डंकी रूट किंवा इतर मार्गाने अमेरिकेत पोहोचले होते, परंतु त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. अमेरिकेने भारतासह ब्राझील, मेक्सिको आणि इतर अनेक देशांतून आलेल्या बेकायदेशीर प्रवाशांनाही परत मायदेशी पाठवले आहे. तसेच, ज्यांच्या नागरिकत्वाची खात्री होत नाहीये, अशांना तुरुंगात देखील ठेवण्यात आले आहे.
( सविस्तर बातमी थोड्याच वेळात )