Naxalites : बुरगुमच्या घनदाट जंगलात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान, शस्त्रे जप्त

बुरगुमच्या घनदाट जंगलात सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 16 Apr 2025
  • 07:11 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहेत. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. आज पुन्हा एकदा बुरगुमच्या घनदाट जंगलात सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्याकडील शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस्तरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैनिकांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मृत्यू झालेल्यापैकी एक कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. बुरगुमच्या जंगलात अजूनही ही कारवाई सुरू आहे. जवानांनी जंगलात नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त केला आहे.

इंद्रावती नदीच्या आसपास असणाऱ्या जंगल परिसरात नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाना प्राप्त झाली. त्यानुसार सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. आज सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास सुरक्षा दले अन् नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यानंतर या सर्च ऑपरेशनमध्ये २ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. सीआरपीएफच्या माहितीनुसार, हे सर्च ऑपरेशन शनिवारी सकाळी सुरू झाले होते. चकमकीदरम्यान कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. तर २ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमक अजूनही सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

Share this story

Latest