'Jai Badri Vishal' : हिमालयात निनादला 'जय बद्री विशाल'चा नाद

बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. मंदिराला १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. सकाळपासून बर्फ पडत असतानाही शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. लष्कराने बँडची धून वाजवली तर भाविकांनी दिलेल्या 'जय बद्री विशाल'च्या घोषणांनी परिसर निनादत होता. दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 05:50 pm
हिमालयात निनादला 'जय बद्री विशाल'चा नाद

हिमालयात निनादला 'जय बद्री विशाल'चा नाद

तब्बल सहा महिन्यांनी उघडले बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे; पंधरा क्विंटल फुलांनी केली मंदिराची सजावट

#बद्रीनाथ

बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. मंदिराला १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. सकाळपासून बर्फ पडत असतानाही शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. लष्कराने बँडची धून वाजवली तर भाविकांनी दिलेल्या  'जय बद्री विशाल'च्या घोषणांनी परिसर निनादत होता. दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते.

चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रिनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिरातील पहिली पूजा करण्यात आली. मंदिराची द्वारे खुली करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण मंदिरावर झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे खुले झाल्यावर चारधाम यात्रेची औपचारिक सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली.

प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक बद्रिनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. बद्रिनाथ धाममध्ये अधूनमधून होणारी बर्फवृष्टी आणि पाऊस पाहता त्यांनी भाविकांना यात्रा सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता निवासाची व्यवस्था अगोदरच करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान  हवामान खात्याने २९ एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे, राज्य सरकारने केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह अनेक ठिकाणी यात्रेकरूंना सध्या तिथेच थांबण्यास सांगितले जात आहे. उत्तराखंडची चारधाम यात्रा २२ एप्रिलपासून सुरू झाली आहे. २२ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले तर २७ एप्रिलला बद्रिनाथ धामचे  दरवाजे उघडले आहेत. केदारनाथ मंदिर अक्षय्य तृतीयेलाच खुले होणार होते. मात्र प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे हा निर्णय 

लांबवण्यात आला.

असा आहे भक्तांचा समज

बद्रिनाथचे दरवाजे उघडल्यानंतर खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. बद्रिनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम आहे. बद्रिनाथमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, असे समजले जाते.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest