Congress party : मध्य प्रदेशातही काँग्रेस पक्ष कर्नाटक पॅटर्न राबवणार

काँग्रेसने कर्नाटकात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक भर दिला होता. त्याच्या आधारे प्रचाराचा धुरळा उडवत मतदारांकडे सत्ता देण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्यांनी सामान्य नागरिक, महिला आणि युवकांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे काँग्रेसला कर्नाटकात अभूतपूर्व यश मिळाले आहे. काँग्रेसने तिथे एकहाती सत्ता मिळवली असून आता त्यांनी आपले लक्ष मध्य प्रदेशकडे वळवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Admin
  • Tue, 23 May 2023
  • 12:43 pm
मध्य प्रदेशातही काँग्रेस पक्ष कर्नाटक पॅटर्न राबवणार

मध्य प्रदेशातही काँग्रेस पक्ष कर्नाटक पॅटर्न राबवणार

ट्विटवर दिलेल्या आश्वासनात सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर भर

#नवी दिल्ली

काँग्रेसने कर्नाटकात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक भर दिला होता. त्याच्या आधारे प्रचाराचा धुरळा उडवत मतदारांकडे सत्ता देण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्यांनी सामान्य नागरिक, महिला आणि युवकांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे काँग्रेसला कर्नाटकात अभूतपूर्व यश मिळाले आहे. काँग्रेसने तिथे एकहाती सत्ता मिळवली असून आता त्यांनी आपले लक्ष मध्य प्रदेशकडे वळवले आहे. आगामी काळात मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुका होणार असून तेथे काँग्रेस कर्नाटक पॅटर्नच राबवणार असल्याचे दिसत आहे.

मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसने मध्य प्रदेशातील जनतेसाठी पाच आश्वासने जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही आश्वासने जाहीर केली आहेत. महागाईने उच्चांक गाठलेला असताना सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता सिलिंडर अवघ्या ५०० रुपयांत देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने मध्य प्रदेशच्या जनतेला दिले आहे. तसंच, प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रतिमहिना, १०० युनिटपर्यंत मोफत वीज, तर २०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, जुनी पेन्शन योजनाही लागू करणार, असे आश्वासन दिले आहे. आम्ही कर्नाटकात आश्वासन पूर्ण केले आहे, आता मध्य प्रदेशातही करणार. जय जनता, जय काँग्रेस असे ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

कर्नाटकात निवडणुका जाहीर होताच जागावाटपाच्या काळात भाजपचे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मध्य प्रदेशात आता केव्हाही निवडणुकीचे पडघम वाजू शकतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपला सुरुंग लावण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. बालाघाटचे माजी आमदार अनुभा मुंजारे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story