संग्रहित छायाचित्र
Sunetra Pawar| NCP Ajit Pawar| Rajya Sabha| राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांचा पहिलाच कार्यकाळ आहे. सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे
राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक… pic.twitter.com/4HagR71CSZ
— Sunil Tatkare (@SunilTatkare) February 4, 2025
आपल्या एक्स पोस्टमध्ये तटकरे म्हणाले, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!”