Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख...

तत्पूर्वी, सकाळी पंतप्रधान मोदी यांनी अह्मदाबादमधल्या अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Fri, 13 Jun 2025
  • 02:54 pm
National news, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

PM visits crash site....

Ahmedabad | अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या अपार वेदना आणि हानी याबद्दल दुःख व्यक्त करून मोदी यांनी आपल्या सहवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचे सांगितले.  तत्पूर्वी, सकाळी पंतप्रधान मोदी यांनी अह्मदाबादमधल्या अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली.

एक्सवरील स्वतंत्र पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे  की ''अहमदाबादमधील हवाई दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. इतक्या क्षणार्धात आणि हृदयद्रावकरित्या एवढे जीव गमावण्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांचे दुःख आणि त्यांच्या आयुष्यात भरून न येणारी पोकळी समजू शकतो. ओम शांती.''

पुढे त्यांनी म्हटले आहे की ''अहमदाबादमधल्या दुर्घटनास्थळाला आज भेट दिली. विनाशकारी दृश्य दुःखद आहे. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना कायम आहेत.”

Share this story

Latest