PM in Ghana : पंतप्रधान मोदींना घानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान....

या विशेष सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी घानाच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Thu, 3 Jul 2025
  • 03:15 pm
National news, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

PM in Ghana

नवी दिल्ली (दि.03) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपुण राजकारणपटुत्व आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यांची दखल घेत आज घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी घानाचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ - पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला. 140 कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी हा सन्मान भारतीय तरुणांच्या आकांक्षा, त्याच्या सांस्कृतिक परंपरा आणि विविधता आणि घाना व  भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला आहे.

या विशेष सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी घानाच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि परंपरा आपल्या सहयोगाला चालना देत राहतील हे नमूद करत  पंतप्रधान म्हणाले, की हा पुरस्कार दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करत आहे आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी  त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी  सोपवत आहे.  घानाला दिलेल्या या  ऐतिहासिक राजकीय भेटीमुळे भारत-घाना संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी  यावेळी व्यक्त केला.

Share this story

Latest