पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. सिंधू नदी जल करार रद्द ते पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय भारताने घेतले आहेत. दरम्यान, भारत सरकारने आता 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे.
बंदी घातलेल्या युट्यूबर्स चॅनेल्समध्ये काही वृत्त वाहिन्यांच्या चॅनेल्सचादेखील समावेश आहे. 'डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज' या वृत्तवाहिन्यांच्या चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. तर इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारुख यांसारख्या पत्रकारांनी चालवलेल्या यूट्यूब चॅनेलादेखील या कारवाईमध्ये समावेश आहे.
गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे चॅनेल्स चुकीची आणि खोटी माहिती, जातीय तणाव निर्माण करण्याचा कंटेंट पसरवत असल्याचे आढळून आले.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, Government of India has banned following Pakistani YouTube channels for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and misinformation against
— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2025
India, its Army and security… pic.twitter.com/2AjzeEuCsW