संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. सांयकाळी 5 वाजेपर्यंत 57.78 टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार असून तेव्हाच कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.78 टक्के मतदान झाले. यापूर्वी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55 टक्के मतदान झाले होते. दोन तासांत केवळ 12 टक्के मतदान झाले.