NIA raids : जम्मू-काश्मिरात एनआयएचे छापे

दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कट प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. यामध्ये अनंतनागमध्ये चार, शोपियानमध्ये तीन, बडगाम, श्रीनगर आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन आणि बारामुल्ला आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी शोध घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 10 May 2023
  • 01:20 am
जम्मू-काश्मिरात एनआयएचे छापे

जम्मू-काश्मिरात एनआयएचे छापे

 #श्रीनगर

दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कट प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. यामध्ये अनंतनागमध्ये चार, शोपियानमध्ये तीन, बडगाम, श्रीनगर आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन आणि बारामुल्ला आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी शोध घेण्यात आला.

एनआयएच्या वतीने गेल्या वर्षी २१ जून रोजी दहशतवादी कारस्थानाबाबत गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी ज्या ठिकाणी शोध घेतला जात आहे. त्यामध्ये रेझिस्टन्स फ्रंट, युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू आणि काश्मीर, मुजाहिदीन गजवत-उल-हिंद, जम्मू आणि काश्मीर फ्रीडम फायटर्स, काश्मीर टायगर्स आणि तिथले आहेत. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या सहयोगी आणि शाखांशी संलग्न केडर आहेत. एनआयएच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे लोक बॉम्ब, आयईडी, रोख रक्कम, अमली पदार्थ आणि लहान शस्त्रे गोळा करून वितरित करायचे काम करतात.

एनआयएने गेल्या वर्षी २ मे रोजी रात्री उशिरापर्यंत जम्मू-काश्मीरमधील १२ ठिकाणी दहशतवादी कट रचल्याप्रकरणी छापे टाकले होते. पुलवामा जिल्ह्यातील आठ ठिकाणी, कुलगाम, अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यात प्रत्येकी एक आणि जम्मूमध्ये एका ठिकाणी शोध घेण्यात आला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest