Rahul Gandhi: ना प्रजासत्ताक दिनाला, ना महाकुंभाला, ना पक्षाच्या कार्यक्रमांना... राहुल गांधी आहेत कोठे?

भारताने नुकताच ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. तसेच, प्रयागराज येथे महाकुंभ सुरु आहे आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात देशभरातील नेते सहभागी झाले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 4 Feb 2025
  • 10:29 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारताने नुकताच ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. तसेच, प्रयागराज येथे महाकुंभ सुरु आहे आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात देशभरातील नेते सहभागी झाले होते. अनेक नेत्यांनी प्रयागराजमध्ये कुंभस्नान केले किंवा तेथील कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मात्र, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेत आहे.

महाकुंभापासून दूरावा
भारत हा सांस्कृतिक परंपरा आणि लोकशाही मूल्यांनी समृद्ध देश आहे. पण, राहुल गांधी वारंवार या मूल्यांपासून दूर राहत असल्याचे दिसते. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा मानला जातो. भाजप नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याला जागतिक महत्त्व प्राप्त करून दिले, मात्र राहुल गांधींनी या कार्यक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

प्रजासत्ताक दिनालाही अनुपस्थित
प्रजासत्ताक दिनाची परेड ही भारताच्या लोकशाही आणि सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. मात्र, यंदा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी या परेडला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती लोकशाही मूल्यांबाबत त्यांच्या गांभीर्याबद्दल प्रश्न निर्माण करते.

पूर संकटात होते सुट्टीवर
जेव्हा देशातील अनेक राज्ये पूरग्रस्त होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदतकार्य पाहत होते, तेव्हा राहुल गांधी मात्र परदेशी सुट्टीचा आनंद घेत होते. अशा काळात त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या नेतृत्वाच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संविधान दिनी अनुपस्थिती
संविधान दिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी अनुपस्थित राहिले. २०२२ मध्ये त्यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन देखील केले नाही. त्यामुळे घटनात्मक मूल्यांबद्दल त्यांचे गांभीर्य कमी असल्याचे दिसून येते.

राम मंदिर भूमीपूजनालाही गैरहजेरी
अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन हे ऐतिहासिक होते, मात्र राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात भाग घेतला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीवर आणि भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

काँग्रेसच्या विजय सोहळ्यातही अनुपस्थित
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी विजयोत्सवाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आणि त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका निर्माण झाली.

दिल्ली निवडणुकीतही रस नाही
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. काँग्रेसची लढाई तिरंगी होण्याची शक्यता होती, मात्र पक्षाचा प्रचार कमकुवत होत चालल्याचे स्पष्ट होते. राहुल गांधी प्रचारात दिसत नाहीत, त्यामुळे काँग्रेसच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राहुल गांधी आहेत कोठे?
दिल्लीच्या निवडणुकीत, महाकुंभात, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कुठेही राहुल गांधी दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वावर आणि राजकीय सक्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Share this story

Latest