‘आप’च्या ओबेरॉय दिल्लीच्या महापौर

भारतीय जनता पक्ष आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांचे प्रयत्न न्यायालयात अयशस्वी झाल्यानंतर बुधवारी झालेल्या दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर आप आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या.शैली यांना १५० मते पडली तर प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या रेखा गुप्ता यांना ११६ मते पडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Feb 2023
  • 11:24 am
‘आप’च्या ओबेरॉय दिल्लीच्या महापौर

‘आप’च्या ओबेरॉय दिल्लीच्या महापौर

उपमहापौरपदीही ‘आप’चा उमेदवार, गुंडाची हार, जनतेचा विजय - केजरीवाल

#नवी दिल्ली

भारतीय जनता पक्ष आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांचे प्रयत्न न्यायालयात अयशस्वी झाल्यानंतर बुधवारी झालेल्या दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर आप आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या.शैली यांना १५० मते पडली तर प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या रेखा गुप्ता यांना ११६ मते पडली.

उपमहापौरपदाची निवडणूकही आप आदमी पक्षाने जिंकली असून त्यांचे उमेदवार आले मंहमद इकबाल विजयी झाले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमल बागडी यांना हरवले. मतदानात २६५ जणांनी भाग घेतला. यातील आप आदमीला १४७ मते पडली तर भाजप उमेदवाराला ११६ मते पडली. २ मते अवैद्य ठरली. 

राज्यपाल नियुक्त नगरसेवकांनाही मतदानात भाग घेण्याचा हक्क असेल असे नायब राज्यपालांनी जाहीर केले. त्याला आपने प्रचंड विरोध केल्याने महापौरपदाची निवडणूक तीन वेळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त सदस्यांना मतदानात भाग घेण्याचा हक्क नसेल असे जाहीर केल्याने नायब राज्यपालांना माघार घ्यावी लागली. 

दिल्ली महापालिकेच्या ४ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत आप आदमी पक्षाचे १३४ नगरसेवक विजयी झाले होते. 

२५० नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत आप आदमी पक्षाने बहुमत प्राप्त करत पंधरा वर्षांची भारतीय जनता 

पक्षाची सत्ता संपुष्टात आणली होती. दुसऱ्या स्थानावरील भारतीय जनता पक्षास १०४ वॉर्डात विजय मिळाला होता तर काँग्रेसला ९ वॉर्डात विजय मिळाला. 

दिल्लीतील संसद सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, संसद सदस्य असे एकूण ११३ सदस्यांचे मतदान भाजपकडे होते. मात्र, त्यांना ११६ मते पडली आहेत.काँग्रेसचे ९ नगरसेवक असून त्यांनी मतदानांवर बहिष्कार घातला होता. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवक शीतल यांनी पक्षाचा निर्णय अव्हेरून मतदानात भाग घेतला. 

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest