Hamas : भारताच्या सीमाभागात हमास, जैश आणि लष्करही पीओकेत; पाकिस्तान रचतोय मोठे षड्यंत्र

गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, या माध्यमातून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करू इच्छित आहे. पॅलेस्टाईन आणि काश्मीर हे समान प्रश्न आहेत आणि दोन्ही ठिकाणी मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही ठिकाणांमधील साम्य दाखवून त्यांनी अनेकदा इस्लामिक जगताला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Edited By Admin
  • Wed, 5 Feb 2025
  • 06:57 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.  यामुळे गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत. गुप्तचर सूत्रांनुसार,  दहशतवादी संघटनांकडून पीओकेमध्ये एक कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये हमासचा एक वरिष्ठ कमांडर  संबोधित करणार आहे. या कार्यक्रमात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटांचे दहशतवादी उपस्थित राहतील आणि हमासचे प्रवक्ते खालिद कद्दुमी यांचे भाषण ही यावेळी होणार आहे. यावरून जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान किती मोठे षड्यंत्र रचत आहे हे दिसून येते. जैश आणि लष्कर सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात मजबूतच होत असताना आता पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास देखील आपली मुळे मजबूत करत आहे.

गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, या माध्यमातून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करू इच्छित आहे. पॅलेस्टाईन आणि काश्मीर हे समान प्रश्न आहेत आणि दोन्ही ठिकाणी मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही ठिकाणांमधील साम्य दाखवून त्यांनी अनेकदा इस्लामिक जगताला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तुर्की आणि मलेशिया सारख्या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून अनेकदा भारताला दुखावणाऱ्या गोष्टी बोलल्या आहेत, परंतु सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि कुवेत सारखे देश पाकिस्तानच्या प्रचारापासून दूर राहिले आहेत. पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिन साजरा केला जातो. या दिवशी सरकारी कार्यक्रमांमध्ये काश्मीरबाबत प्रचार केला जातो. याअंतर्गत, दहशतवादी संघटनांकडून एक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.  

दरम्यान,  पीओकेमध्ये होणारा कार्यक्रम अल अक्सा फ्लडच्या बॅनरखाली आयोजित केला जाणार आहे.   ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात सुमारे ७०० लोक मारले गेले आणि शेकडो लोकांना हमासने तुरुंगात टाकले. खरंतर अल अक्सा ही जेरुसलेममध्ये असलेली एक मशीद आहे, ज्यावर मुस्लिम आणि यहुदी दोघेही दावा करतात. त्याच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशनच्या नावाखाली पीओकेमध्ये कार्यक्रम आयोजित करणे हे धोकादायक लक्षण आहे. याद्वारे दहशतवादी संघटना मुस्लिम उम्माच्या एकतेचा संदेश देऊ इच्छितात. तुम्हाला सांगतो की, पाकिस्तानने अनेकदा पॅलेस्टाईनमधील इस्रायली हल्ल्यांच्या छायाचित्रांचा बनावट प्रचार केला होता आणि ते काश्मीरमधील असल्याचे म्हटले होते आणि त्यांचे खोटेपणा देखील उघड झाला होता.

Share this story

Latest