अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा; सोन्याचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Mon, 28 Apr 2025
  • 11:58 am
gold rate today akshaya tritiya, Gold forecast monthly, gold price forecast weekly, silver price, silver price today, silver price forecast, silver rate, silver rate weekly

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने सुमारे 1000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 एप्रिल रोजी सोन्याचा भाव एक लाखावर पोहचला होता.  22 कॅरेट सोन्याची किंमत 89,400 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 97,500 रुपये आहे. चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या वर आहे. 

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे आणि  सुरू असलेल्या संघर्षामुळे सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने पुन्हा महाग झाल्यामुळे भारतातही सोन्याचा दरात मोठा बदल होत आहे. 

सोन्याचे दर पुढील प्रमाणे

मुंबई 89,400 97,530

दिल्ली 89,550 97,680

चेन्नई 89,400 97,530

कोलकाता 89,400 97,530

जयपूर  89,550 97,680

नोएडा 89 ,550 97,680

गाझियाबाद 89 ,550 97,680

लखनौ 89 ,550 97,680

बेंगळुरू 89,400 97,530

पाटणा 89,400 97,530

Share this story

Latest