Gold Price Hike : प्रतितोळा सोन्याचा भाव लाखाच्या घरात, सोन्याच्या किंमतीचा उच्चांक

आगामी काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात 10 ग्राम सोन्याचे भाव हे 1 लाख रुपये असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारात उत्सुकता वाढली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Sunil Chavan
  • Fri, 18 Apr 2025
  • 07:59 am
pune mirror, crime news, marathi news, pune news, pune police

सोन्याच्या चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतो. मात्र आज 18 एप्रिल 2025 या दिवशी सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे.18 एप्रिल रोजी भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,732 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,921 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,300 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,320 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,000 रुपये आहे. भारतात आज 18 एप्रिल रोजी  चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,900 रुपये आहे.

आगामी काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात 10 ग्राम सोन्याचे भाव हे 1 लाख रुपये असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारात उत्सुकता वाढली आहे. या दरवाढीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील चलनवाढ, ट्रेड वॉर आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा हे मानले जात आहे.

Share this story

Latest