'Water' metro : भारतात सुरू झाली पहिली 'वॉटर' मेट्रो

भारतातील पहिली 'वॉटर' मेट्रो केरळमध्ये सुरू झाली आहे. या मेट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे ती १० बेटांना जोडणारा प्रवास करणार आहे. देशातील ही पहिलीच मेट्रो असेल जी रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. केरळ दौऱ्यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. बॅटरीवर चालणारी ही इलेक्ट्रिक हायब्रिड बोट कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 01:19 pm
भारतात सुरू झाली पहिली 'वॉटर' मेट्रो

भारतात सुरू झाली पहिली 'वॉटर' मेट्रो

रुळांवर नाही तर पाण्यावर धावणारी मेट्रो; केरळवासीयांसाठी स्वस्तात मस्त प्रवास

#कोची

भारतातील पहिली 'वॉटर' मेट्रो केरळमध्ये सुरू झाली आहे. या मेट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे ती १० बेटांना जोडणारा प्रवास करणार आहे. देशातील ही पहिलीच मेट्रो असेल जी रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. केरळ दौऱ्यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. बॅटरीवर चालणारी ही इलेक्ट्रिक हायब्रिड बोट कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

ही वॉटर मेट्रो शहरी भागातील एक वेगळ्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था आहे. पारंपरिक मेट्रोशी तुलनात्मक पातळीवर सोपी आणि आरामदायी अनुभव देते. कोचीसारख्या शहरांसाठी हा पाण्यातील प्रवासाचा मार्ग मौल्यवान आहे.  हा प्रकल्प कोची आणि आसपासच्या लोकांसाठी आणि जगभरातील पर्यटकांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास प्रदान करेल.

कोची वॉटर मेट्रो हा खास प्रोजेक्ट असून वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा हा प्रकल्प आहे. कोची हे शहर अनेक बेटांनी वेढलेले आहे. यांपैकी १० बेट महत्त्वाचे असून त्यावरची लोकसंख्याही जास्त आहे. या बेटांवर राहणाऱ्या ज्या लोकांना आपल्या विविध कामांसाठी कायम कोची शहरात यावे लागते. त्यांना या आरामदायी वॉटर मेट्रोची सुविधा अगदी कमी खर्चात वापरता येईल, अशी माहिती कोची मेट्रो रेल लिमिटेडचे एमडी लोकनाथ बेहेरा यांनी दिली आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटींसह वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तर व्यित्तला-कक्कनड टर्मिनल प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील. माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.

काय आहे वॉटर मेट्रोची खासियत ?

  मेट्रो प्रकल्पाची सुरुवात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींनी केली जाईल.

  केरळ सरकार आणि जर्मन कंपनी केएफडब्ल्यू मिळून हा ड्रीम प्रोजेक्ट विकसित करत आहे.

  यामध्ये ३८ टर्मिनल आणि ७८ इलेक्ट्रिक बोटींचा समावेश आहे.

 'केडब्ल्यूएम' सेवा पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन आणि वायटीला-कक्कनड टर्मिनल्सवरून सुरू होईल.

  बोटीच्या प्रवासाचा तिकीट दर २० रुपयांपासून सुरू होतो. वारंवार येणाऱ्या प्रवाशांसाठी साप्ताहिक आणि मासिक पास उपलब्ध आहेत.

  कोची वन कार्ड वापरून, कोणीही कोची मेट्रो रेल्वे आणि कोची वॉटर मेट्रो या दोन्हींमधून प्रवास करू शकतात. कोची वन अॅप वापरकर्त्यांना डिजिटल पद्धतीने तिकिटे खरेदी करता येणार आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest