Exotic Dancer : मतदारांसाठी विदेशी नृत्यांगनेचा कार्यक्रम

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात नायक ज्याप्रमाणे मतदारांसाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित करतो, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशात महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराने मतदारांना खुश करण्यासाठी रशियन नृत्यांगनांचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. ही मागणी करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 5 May 2023
  • 03:14 pm
मतदारांसाठी विदेशी नृत्यांगनेचा कार्यक्रम

मतदारांसाठी विदेशी नृत्यांगनेचा कार्यक्रम

उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणूक प्रचारात रशियन मुलींचा डान्स; परवानगी मागणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

#लखनौ  

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात नायक ज्याप्रमाणे मतदारांसाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित करतो, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशात महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराने मतदारांना खुश करण्यासाठी रशियन नृत्यांगनांचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. ही मागणी करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवार पैसे, मद्य वाटत असतो. कुठे कुठे टीव्ही, फ्रीज, कुलर वाटले जातात. कुठे पेट्रोल फुकट दिले जाते. कुठे मद्य आणि मांसाहारी जेवण फुकट दिले जाते. उत्तर प्रदेशात आंबेडकरनगरचे अपक्ष उमेदवार संजय दुबे यांनी मतदारांसाठी खास विदेशी नृत्यांगना नाचवण्याची संमती मागितली आहे. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमात हजर मतदारांना मद्य वाटण्यासाठी संमती द्यावी, असा आग्रह धरल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये महापालिका निवडणुकांचा प्रचार जोशात केला जातो आहे. सगळेच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फंडे आजमवताना दिसत आहेत. अशात वॉर्ड ३० मधल्या एका अपक्ष उमेदवाराने रिटर्निंग ऑफिसरला लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे. निवडणूक आयोगाकडे या उमेदवाराने रशियन मुलींच्या नाचाची संमती मागितली आहे तसंच लोकांना मद्यपान करण्याची संमती द्यावी, असेही म्हटले आहे.

या अपक्ष उमेदवाराने लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. या दरम्यान एक  व्हीडीओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रशियन मुलगी नाचताना दिसते आहे. एस. पी. ब्रजनारायण सिंह यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. वॉर्ड ३० चे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट संजय दुबे हे निवडणूक लढवत आहेत. यांनीच हे पत्र लिहिले आहे. या पत्रात असेही लिहिले आहे की, नृत्यांगना २० वर्षांची असावी आणि या कार्यक्रमात लोकांना मद्य वाटण्याची संमती द्यावी. अपक्ष उमेदवार संजय दुबे यांचे प्रचारचिन्ह पेन्सील आहे. दरम्यान आंबेडकरनगरचे अपक्ष उमेदवार संजय दुबे यांनी या संदर्भात कॅमेरासमोर काही बोलणे टाळले आहे. हे पत्र मात्र २ दिवसांपासून व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस हे प्रकरण गांभीर्याने तपासत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest