Liquor policy : ‘मद्य धोरण आरोपपत्रात ‘ईडी’ने चुकीने नाव घातले’

दिल्लीच्या मद्य धोरण खटल्यात आपले नाव चुकीने घातले असल्याची माहिती महसूल संचलनालयाने (एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी) एका पत्राद्वारे दिली असल्याचा दावा आपचे खासदार संजयसिंग यांनी केला आहे. यानंतर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 4 May 2023
  • 04:26 am
‘मद्य धोरण आरोपपत्रात ‘ईडी’ने चुकीने नाव घातले’

‘मद्य धोरण आरोपपत्रात ‘ईडी’ने चुकीने नाव घातले’

‘ईडी’विरोधात खटला दाखल करणार; संजयसिंग

#नवी दिल्ली

दिल्लीच्या मद्य धोरण खटल्यात आपले नाव चुकीने घातले असल्याची माहिती महसूल संचलनालयाने (एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी) एका पत्राद्वारे दिली  असल्याचा दावा आपचे खासदार संजयसिंग यांनी केला आहे. यानंतर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. दिल्लीतील मद्य धोरणाबद्दल दाखल झालेल्या आरोपपत्रात संजयसिंग यांचे नाव चुकीने घातले गेल्याचे ईडीनेच संजयसिंग यांना पाठवलेल्या पत्रात मान्य केले आहे. यामुळे मद्य धोरणाचा सारा खटला पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट होतअसल्याचे सांगून केजरीवाल म्हणाले की, देशातील सर्वात प्रामाणिक पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभणारा नाही. आमच्या पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेला खीळ घालण्यासाठी असे घाणेरडे राजकारण करणे चुकीचे आहे. 

याबबात संजयसिंग म्हणतात की, आरोपपत्रात आपल्या नावाचा झालेला उल्लेख चुकीने झाला असल्याचे ईडीने आपल्याला पत्र पाठवून कळवले आहे. अशा प्रकारची घटना देशाच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. यामुळे मी ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि सहायक संचालक जोगेंद्रसिंग  यांच्याविरूद्ध खटला दाखल करण्याची परवानगी केंद्रीय अर्थसचिवांकडे एका पत्राद्वारे मागितली आहे. ईडीला माहित असूनही आणि जाणीवपूर्वक खोटी, बदनामीकारक, प्रक्षोभक विधाने केली आहेत. या दोघांनी माझी जाहीरपणे माफी मागावी यासाठी त्यांना नोटीस पाठवली आहे.   

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ईडीने असे म्हटले आहे की, आरोपपत्रात संजयसिंग यांचे नाव चार वेळा आले आहे. यातील एकाचा संदर्भ चुकीचा असून त्यात घातलेले संजय सिंग यांचे नाव ही टायपिंग चूक आहे. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान, आपचे नेते राघव चढ्ढा यांचेही नाव आरोपपत्रात असल्याची चर्चा होती. चढ्ढा यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ते म्हणतात की, हा प्रकार केवळ  माझी बदनामी करण्याचा आहे. आपल्या प्रतिमेचे आणि विश्वासार्हतेचा भंग करण्याचा यामागे हेतू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest