मध्य प्रदेशात डॉक्टर संपावर
ग्रामीण भागात चांगल्या सुविद्या द्या, प्रशासकीय हस्तक्षेप रोखा आदी मागण्यांसाठी मध्य प्रदेशच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर बुधवारपासून बेमुदत संपावर गेले असून ठिकठिकाणी त्यांनी निदर्शने केली. जवळ जवळ १३ हजार डॉक्टर संपावर गेल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.