ईडी छापेमारीमुळे द्रमुकचे मंत्री बालाजी कोठडीत ढसाढसा रडले

अंमलबजावणी संचालनालयाने (एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी) कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी तमिळनाडूत अनेक ठिकाणी मंगळवारी छापे मारले. या छाप्यानंतर द्रमुकचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना अटक केली. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्या वेळी ते रडताना दिसत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 15 Jun 2023
  • 12:59 am
ईडी छापेमारीमुळे द्रमुकचे मंत्री बालाजी कोठडीत ढसाढसा रडले

ईडी छापेमारीमुळे द्रमुकचे मंत्री बालाजी कोठडीत ढसाढसा रडले

#चेन्नई

अंमलबजावणी संचालनालयाने (एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी)  कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी तमिळनाडूत अनेक ठिकाणी मंगळवारी छापे मारले. या छाप्यानंतर द्रमुकचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना अटक केली. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्या वेळी ते रडताना दिसत होते. छातीतल वेदनांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर सध्या चेन्नईतल्या ओमंदुरार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ईडीने बालाजी यांच्या कार्यालयासह त्यांचा गृह जिल्हा करूरमध्येदेखील छापेमारी केली. पाच वर्षातली ईडीची सचिवालयामधील ही दुसरी छापेमारी आहे. बालाजी यांच्यावरील कारवाईनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

स्टॅलिन म्हणाले की, सत्ताधारी भाजपा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा ज्या लोकांचा सामना करू शकत नाही त्यांना मागल्या दाराने धमकावण्याचे राजकारण करते. परंतु त्यात ते यशस्वी होणार नाही, हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. बालाजी यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिले होतं. सचिवालयात मंत्र्यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्याची काय गरज होती, ही गोष्ट मात्र मला समजली नाही. 

दरम्यान, सत्तारुढ द्रमुक पक्षाने या कारवाईचा निषेध केला आहे. द्रमुक पक्षाचे सचिव आर. एस. भारती म्हणाले की, पक्षाने यापूर्वी असे अनेक छापे पाहिले आहेत, परंतु त्यांच्या नेत्यांवर कोणतेही आरोप याआधी सिद्ध झालेले नाहीत. हा केवळ पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सुप्रीम कोर्टाने बालाजी यांच्याविरोधात कथित कॅश फॉर जॉब घोटाळाप्रकरणी पोलीस आणि ईडीला तपासाचे आदेश दिले आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही छापेमारी केली. बालाजी हे वीजेसह राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचेही मंत्री आहेत. बालाजी म्हणाले की, ईडीचे अधिकारी नेमकं काय शोधत आहेत ते मला माहिती नाही. या तपासात यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वास मी त्यांना दिलं आहे. बालाजी याआधी अण्णाद्रमुक पक्षात होते. दिवंगत जयललिता यांच्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन मंत्री म्हणून काम केलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest