दहा अब्ज डॉलर्सच्या टेक फर्म ‘रिपलिंग’चे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर गेल्या दोन दिवसांपासून खासगी आयुष्यामुळं चर्चेत आहेत. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर पत्नीनेही पलटवार करत प्रसन्ना शंकर याचे आरोप फेटाळले आहेत. पत्नी विरोधात प्रसन्ना शंकर यांनी अनेक ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. प्रसन्ना शंकर यांनी ट्विटरवर आपली बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी पत्नीचे काही वैयक्तीक चॅटदेखील शेअर केले आहेत.
प्रसन्ना शंकर यांचे ट्वटि नेमकं काय?
माझं नाव प्रसन्न आहे. मी 10 अब्ज डॉलर्स एवढी किंमत असलेल्या रिपलिंग कंपनीची स्थापना केली होती. मात्र, अजूनही मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून बाहेर आलेलो नाही. सध्या मी चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडूच्या बाहेर लपलोय. माझ्या लग्नाला 10 वर्षे होऊन गेली आहेत. मला पत्नी दिव्यापासून 10 वर्षांचा मुलगा आहे. अलिकडेच मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. मला कळले की तिचे अनूप नावाच्या व्यक्तीसोबत 6 महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे मी तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय"
तसचे, मला त्यांच्या अफेअरबाबत अनूप कुट्टीसंकरनच्या पत्नीकडून समजले. अनुपच्या पत्नीने दोघांमध्ये होत असलेल्या चॅटींगचे स्क्रिनशॉट मला पाठवले. त्यांनी त्याच्यासाठी हॉटेल बूक केला असल्याचा दावाही प्रसन्ना शंकर यानी केलं आहे.
अब्जाधीशाच्या पत्नीचे काय आहेत चॅट?
"तू माझ्यासाठी XL साइजचं कंडोम घेऊन ये शकतो का? हे Guardian, Watsons किंवा 7-Eleven मध्ये मिळू शकतं. या मेसेजला प्रत्युत्तर देऊ नको. मी ते डिलीट करणार आहे.
महिलांचे गुपचूप व्हिडीओ बनवतो
प्रसन्ना शंकर यांच्या आरोपानंतर त्यांच्या पत्नीने पलटवार केला आहे. प्रसन्ना शंकर महिलांचे गुपचूप व्हिडिओ बनवत होता. त्याने बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले आणि महिलांचे व्हिडिओ काढले. त्याने लैंगिक अत्याचारही केले. मी सुद्धा याचा बळी ठरली आहे. सिंगापूर पोलिसांनी त्याला या गुन्ह्यांसाठी अटक केली होती, पण तो जामिनावर सुटला. असं पत्नी दिव्या यांनी म्हटलं आहे.
इतकंच नाही, तर अनेक वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याला वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याची नोकरीही गेली असा दावाही पत्नीने केला आहे.
प्रसन्ना शंकर कोण आहेत?
प्रसन्ना शंकर हे सिंगापूरमध्ये स्थायिक असलेले एक भारतीय उद्योजक आहेत. प्रसन्ना शंकर हे १० अब्ज डॉलर्स किमतीच्या वर्कफोर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कंपनी रिपलिंगचे सह-संस्थापक आहेत. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला आहे. टेक उद्योगात त्यांनी आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी त्रिची)मधून कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी मिळवली.
रिपलिंग कंपनी सुरू करण्यापूर्वी शंकर यांनी अनेक टॉप टेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात २००६ मध्ये झाली. गूगलमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली आणि त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट कॅनडामध्ये काम केले.