संग्रहीत छायाचित्र
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत असतानाच आता राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर गगनाला भिडले. हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 98100 रुपयांचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला. एकाच दिवसात या सोन्याच्या किमतीत 1650 रुपयांची वाढ झाली.
‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’च्या मते, मंगळवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 96450 रुपयांवर बंद झाले होते. बुधवारी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98100 रुपयांवर पोहोचली. आता ते हे दर एक लाख रुपयापासून फक्त 1900 रुपये कमी आहे. सोन्यातील दरवाढीचा आलेख पाहता ही पातळी आता फार दूर असल्याचे दिसत नाही. 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भावही 97650 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला आहे. जो मागील दिवशी 96000 रुपयांवरून वाढला होता.