महाकुंभमेळ्यात सर्वांना वेड लावणाऱ्या मोनालिसाच्या पत्रिकेत नेमकं लिहलंय तरी काय? ज्योतिषी म्हणाले...

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणारी मोनालिसाबद्दल ज्योतिष म्हणतात...

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 10:00 am
Maha Kumbh Viral Beauty Monalisa Bhosale, Entertainment, Bollywood, Maha Kumbh, Viral, Maha Kumbh 2025, Beauty, Monalisa Bhosale, Trending, Viral Girl Monalisa, Maha Kumbh Viral Beauty , Viral Beauty Monalisa

Maha Kumbh Viral Beauty Monalisa Bhosale

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यादरम्यान अनेक घडणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. असातच सर्वांना वेड लावणाऱ्या त्या सुंदरीची चर्चा सध्या जगभरात रंगली आहे. व्हायरल होणारी सुंदरी म्हणजे, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा. सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच, ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा यांनी तिचं भविष्य वर्तवले आहे. त्यामुळं आता तिच्या आयुष्यात नेमकं काय घडणार ? याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

 

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणारी मोनालिसा ही मुळची इंदूरची आहे. कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. सुंदर डोळे, सावळा रंग, नजरेत ठामपणा आणि त्या सावळ्या रंगावर चमकणारी तेजस्वी सुंदरता पाहून लोक भारवले आहेत. अचानक एक साधी मुलगी रातोरात सेलिब्रिटी कशी बनली? याचे उत्तर ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.

 

ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा यांचा एका व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये त्यांनी व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका गरीब कुटुंबातील सुंदर डोळ्यांची मुलगी रातोरात इतकी व्हायरल झाली की देश-विदेशातील लोक तिला ओळखू लागले. ज्योतिषशास्त्रानुसार असे तेव्हा घडते जेव्हा कुंभ राशीचा भाऊ, गुरु, शुक्र राक्षसी राशीत वृषभ आणि सूर्य मकर राशीत येतो.

 

10 जानेवारीनंतर सूर्य उत्तरायण उत्तरेकडे वळला आणि दैवी शक्ती जागृत झाल्या. त्यावेळी सूर्य हा डोळ्यांचा कारक होता आणि ब्युटी गर्ल अचानक व्हायरल झाली. असं सांगत ज्योतिषशास्त्रांनी राणू मंडल बाबतीतही असे घडल्याचे यावेळी सांगितले. 

इंटरनेट सेन्सेशन बनल्याने मोनालिसाला कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ

व्हायरल झाल्यानंतर कुंभमेळ्यात येणारा जो तो भाविक तिच्यासोबत सेल्फी काढू लागला. अनेक युट्युबर्स व्हिडीओ बनवण्यासाठी येऊ लागले. यासर्वाचा परिणाम तिच्या व्यवसायावर झाला. लोकांच्या गर्दीमुळं तिला तिचे काम करता आले नाही. त्यामुळं तिच्यावर माघारी परतण्याची वेळ आली. 

 

इंदूर झुसी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तिच्या कुटुंबाकडे मोनालिसा परत आली.  मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी मोनालिसाला घरी परत पाठवले आहे, तर दोन्ही बहिणी अजूनही कुंभमेळ्यात हार विकत आहेत. 

 

Share this story

Latest